Pune Mangeshkar Hospital : …म्हणून पुण्यातील ‘दीनानाथ’मध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड
पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी तिसरा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. मंत्रालयात माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात एक अपडेट समोर आली आहे. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तिसरा अहवाल समोर आला असून यातून ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूचं कारण उघड झालं आहे. तातडीने उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. यासह मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही. मेंदूच्या पेशींवर परिणाम होऊन मेंदूचे कार्य बिघडल्याने मृत्यू झाला, असं अहवालात सांगण्यात आलंय. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात आतापर्यंत तीन अहवाल समोर आलेत. यातील तिसरा अहवाल हा पुणे महापालिकेकडून सादर करण्यात आला असून माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल राज्य सरकारपुढे सादर झालाय. दरम्यान, काल भिसे कुटुंबीयांकडून नुकतीच एक प्रेस नोट जाहीर करण्यात आली होती. यामध्ये भिसे कुटुंबीयांकडून पाच मागण्या करण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते.

