AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पुणे स्टेशनवर आढळली संशयास्पद वस्तू, पुढे काय झालं? पाहा...

Video : पुणे स्टेशनवर आढळली संशयास्पद वस्तू, पुढे काय झालं? पाहा…

| Updated on: May 13, 2022 | 2:47 PM
Share

पुणे रेल्वे स्थानकात (Pune Railway Station News) आढळलेल्या संशयास्पद वस्तू आढळून आली होती. ही वस्तू बॉम्बसदृश्य नसल्याची माहिती सुरुवातील पुणे पोलिसांनी दिली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी ही वस्तू बॉम्बसदृश्य नसल्याचं सुरुवातील म्हटलं होतं. मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ही वस्तू हस्तगत केली. त्यानंतर एका खुल्या मैदानात ही वस्तू आणण्यात आली होती. बॉम्बनाशक […]

पुणे रेल्वे स्थानकात (Pune Railway Station News) आढळलेल्या संशयास्पद वस्तू आढळून आली होती. ही वस्तू बॉम्बसदृश्य नसल्याची माहिती सुरुवातील पुणे पोलिसांनी दिली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी ही वस्तू बॉम्बसदृश्य नसल्याचं सुरुवातील म्हटलं होतं. मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ही वस्तू हस्तगत केली. त्यानंतर एका खुल्या मैदानात ही वस्तू आणण्यात आली होती. बॉम्बनाशक (Bomb squad) पथकाकडून ही वस्तू खुल्या मैदानात ठेवण्यात आली होती. त्यानंतर आजूबाजूचा परिसरही रिकामी करण्यात आला होता. पन्नास ते साठ फूट अंतरवर एक वायर या वस्तूला लावण्यात आलेली. गोण्या आजूबाजूला ठेवल्याचं दिसून आलंय. त्यानंतर एक मोठा आवाज होत स्फोट झाला. बॉम्बनाशक पथकाकडून हा स्फोट घडवून आणण्यात आला आणि ही वस्तू निकामी करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय.