विजय तर आमचा ‘त्याच’ दिवशी झाला होता!; मतमोजणी आधी रविंद्र धंगेकर यांच्याकडून विश्वास व्यक्त
Maharashtra Assembly By Election 2023 Results : कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यांत ही लढत झालीये. त्यामुळे विजयी कोण होणार? हे पाहणं महत्वाचं असेल.
पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. या मतमोजणीला जाण्याआधी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचं त्यांच्या घरी औक्षण करण्यात आलं. यावेळी त्यांनी tv9 मराठीशी बातचित केली. तेव्हा विजयचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “ज्या दिवशी महाविकास आघाडीने माझ्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. त्याचदिवशी माझा विजय निश्चित झाला होता. आज मतमोजणीनंतर 15 हजारांहून अधिकच्या मताधिक्यांनी माझा निश्चित विजय होईल”, असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला. लोकांचा धर्म किंवा जात बघून कधीही भेदभाव केला नाही. तर मनापासून लोकांची कामं केली. म्हणूनच लोकांनी माझ्या पारड्यात मतं टाकली, असंही धंगेकर म्हणालेत.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?

