Pune Swargate Bus Crime Video : ‘काय करायचं ते कर पण…’, स्वारगेट अत्याचार घटनेतील पीडितेची नराधम दत्ता गाडेकडे याचना
आरोपीने पीडितेचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे यातून उघड झाले आहे. काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना स्वारगेट अत्याचार घटनेतील पीडितेने आरोपी दत्तात्रय गाडे याच्याकडे केली.
पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने पीडितेचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे यातून उघड झाले आहे. काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना स्वारगेट अत्याचार घटनेतील पीडितेने आरोपी दत्तात्रय गाडे याच्याकडे केली. इतकंच नाहीतर आरोपी दत्तात्रय गाडे याने दोन वेळा पीडितेवर अत्याचार केल्याचेही पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील एसटीत तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, कोर्टात आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वेगळाच दावा केला. ‘दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या आधी तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसत आहे. कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की झालेली दिसत नाही. दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले. कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती झालेली नाही’, असं आरोपीच्या वकिलाने म्हटलं होतं. आता 12 मार्चपर्यंत आरोपी गाडे हा पोलिसांच्या कोठडीत असणार आहे, त्यामुळे पोलिसांकडून खोलवर तपास करण्यात येणार आहे.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'

