Swargate Bus Crime Video : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या ‘त्या’ प्रश्नानंतर पोलिसांचीच बोलती बंद
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास सुरू असताना स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात तीन तास कसून चौकशी केली.
स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास ताब्यात घेण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेला दिले होते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी संवाद साधला. यावेळी पीडित तरूणीने अधिकाऱ्यांना एकच सवाल केला आणि पोलीसच निरूत्तरित झाल्याचे पाहायला मिळाले. ‘माझ्या बदनामीला जबाबदार कोण ?’ असा प्रश्न त्या पीडित तरूणीने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना विचारला, पण त्यांच्याकडे त्या प्रश्नाचं कोणतंच उत्तर नव्हतं. तो प्रश्न ऐकून तपास अधिकारी देखील निरुत्तर झाले आहेत. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास सुरू असताना स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात तीन तास कसून चौकशी केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी चौकशी केली. मात्र, गाडे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती समोर आली आहे.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती

