बाळासाहेब थोरातांचं नाव घेतलं नव्हतं, त्यांनी मनाला का लावून घेतलं, राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल

महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांनी प्रत्युत्तर देताना विखे पाटील सत्तेत नसल्याने त्यांना नैराश्य आले असावे. त्यांच्या‌ आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही अस म्हटलं होतं.

अहमदनगरमध्ये विखे पाटील – थोरात यांचेत सध्या वाकयुद्ध सुरू आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी नगर जिल्हयातील एका नेत्याच्या‌ पापाचा घडा भरला असून कोणी ‌किती महसुल गोळा ‌केला हे चौकशीत समोर येईल,अस म्हणटले होते. त्यानंतर महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांनी प्रत्युत्तर देताना विखे पाटील सत्तेत नसल्याने त्यांना नैराश्य आले असावे. त्यांच्या‌ आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही अस म्हटलं होतं. त्यानंतर आज पुन्हा विखे पाटलांनी थोरातांवर निशाना साधलाय. बाळासाहेब थोरात निराश का वाटतात हे मला कळत नाही. मी त्यांचे नाव घेतले नव्हते ,  त्यांनी का मनाला लावून घेतले हे कळाले नाही. निराश होण्यापेक्षा त्यांनी जाहीरपणे सांगावे की त्यांनी बदलीत पैसे घेतले नाही , व्यवहारात , स्टँम्प डयुटीत पैसे घेतले नाही किंवा त्यांचे कोणतेही ‌कार्यकर्ते वाळू धंद्यात नाहीत, हे थोरातांनी जाहिरपणे सांगावे.मी जे बोललो ते थोरातांच्या मनाला लागलेले दिसते.चौकशी सुरू आहे त्यात समोर येईलच.मला नैराश्य नाही मात्र माझ्या वक्तव्याने थोरात का निराश झाले हा प्रश्न पडला असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI