Rahul Shewale : मुंबई सफाई कामगारांना घरं देणार, राज्य सरकारच्या निर्णयाचं राहुल शेवाळेंकडून कौतुक
वर्षभर बैठक मागितली होती. पण, बैठक झाली नाही. सफाई कर्मचाऱ्यांचं म्हणणं तत्कालीन सरकारनं ऐकलं नव्हतं. आता सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असल्याचं राहुल शेवाळे म्हणले.
एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले, दिल्लीत केंद्रीय गृहराज्यमंत्री यांची भेट घेतली. राजस्थानातील आठ वर्षांचा दलित विद्यार्थ्याला मारहाण झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. केंद्रानं योग्य ती दखल घेऊन त्याच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त ट्वीट करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांनी मुंबईतील सफाई कामगारांना घर देण्याचा निर्णय अत्यंत चांगला आहे. मालकी हक्काचं घर त्यांना मिळणार आहे. मनपा आय़ुक्तांनी सफाई कामगारांची फसवणूक केली होती. वर्षभर बैठक मागितली होती. पण, बैठक झाली नाही. सफाई कामगारांचं म्हणणं तत्कालीन सरकारनं ऐकलं नव्हतं. आता सफाई कामगारांना न्याय मिळाला असल्याचं राहुल शेवाळे म्हणाले.
Published on: Aug 24, 2022 06:33 PM
विलीनीकरण नाही, पण NDA सोबत जाणार?; पवारांच्या पुढच्या निर्णयाकडे लक्ष
उपोषणानंतर पुन्हा एकदा सोनम वांगचुक चर्चेत, सरकारचं केलं तोंडभर कौतुक,
महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते; पवारांचा मोठा गौप्यस्फोट
ड्रग्ज म्हणजे छुपं युद्ध! मुंबई ड्रग्जमुक्त करणारच!

