AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Solapurkar Video : 'आंबेडकर ब्राम्हण...', शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकर आता डॉ. बाबासाहेबांबद्दल बरळला

Rahul Solapurkar Video : ‘आंबेडकर ब्राम्हण…’, शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकर आता डॉ. बाबासाहेबांबद्दल बरळला

| Updated on: Feb 10, 2025 | 11:15 AM
Share

शिवरायांनंतर आता राहुल सोलापूरकरनं बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं एक वक्तव्य व्हायरल झालं. ज्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटताच पुन्हा एकदा सोलापूरकरनं माफी मागितली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रहा सुटकेवर वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरचं आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांबद्दल विधान व्हायरल झालाय. विधानावरूनही तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्याने सोलापूरकरवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. ‘मी रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडून दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो. भीमराव आंबेडकर ब्राम्हण ठरतात वेदांमध्ये…’, असं वक्तव्य राहुल सोलापूरकर याने केलंय. या आधी शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले. या सोलापूरकरच्या विधानावरून वाद उद्भववल्यानंतर सोलापूरकरनं माफी मागितली. तर संतापलेल्या जमावामुळे पुण्यातील सोलापूरकरच्या घरात पोलीस संरक्षण देण्यात आलं. मात्र अद्यापही कोणताही गुन्हा दाखल न झाल्यामुळे आंदोलक सोलापूरकरवर कारवाईच्या मागणीसाठी ठाम आहेत. हिंदुत्ववादी विचारांना मानणारा सोलापूरकर याआधी देखील अनेक विधानांनी चर्चेत राहिलाय. मात्र यावेळी एकाच आठवड्यात सोलापूरकरनं केलेली विविध वादग्रस्त विधान सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मोठा वाद होतोय.

Published on: Feb 10, 2025 11:14 AM