VIDEO : “आई-वडील, भाऊ, भावजय, भावाचं अख्खं कुटुंब गेलं, माहेरचं स्मशान झालं”

तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेला आज दोन दिवस होत आहेत. या दुर्घटनेची भीषणता आता हळूहळू समोर येत आहे.

रायगड : तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेला आज दोन दिवस होत आहेत. या दुर्घटनेची भीषणता आता हळूहळू समोर येत आहे. तळीये गावात मृतांचा खच सापडत आहेत. गुरुवारी 22 जुलैला दुपारी भीषण पाऊस झाला आणि तळीये गावावर डोंगरकडा कोसळला. यामध्ये 35 घरं गाढली गेली. यामध्ये एका महिलेचं आख्खं कुटुंब संपलं. आई-वडील, भाऊ, भावजंय, भावाचं आख्खं कुटुंब गेल्याचं सांगत या महिलेने हंबरडा फोडला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI