Rain Video : भिवंडीतही मुसळधार पावसाचा फटका, नागरिक गुडघाभर पाण्यातून काढताहेत वाट
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. भिवंडीतही रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे.
भिवंडी : भिवंडी शहरालाही मुसळधार पावसाचा फटका बसल्याचं चित्र आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. इतकंच काय तर गुडघ्याभर पाण्यातून वाट काढत नागरिकांना घरी जावं लागत आहे. भिवंडी कल्याण हा मुख्य रस्त्यातील साईबाबा नाका ते राजनोली नाक्या दरम्यान पाणी साचलं आहे. सुमारे 4 ते 5 फूट पाणी या परिसरात साचल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच या गुडघ्याभर पाण्यातून वाट काढत नागरिक घरचा रस्ता धरत आहे. या प्रवासात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अजूनही पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे लवकरात लवकर घरी जाण्याचा नागरिकांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे भिवंडीच्या भाजीपाला मार्केटमध्ये पाणी साचलं आहे.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
