Rainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

तर विभागाने कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इथे पुढील तीन दिवस पावस पडण्याची शक्यता ही वर्तवली आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 25, 2022 | 9:25 AM

मुंबई : राज्यात मानन्सुन (Monsoon) पुर्व पासवाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. गेल्या दोन दिवसांआधी राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार बॅटींग केल्याने उन्हाच्या झळा झेलणाऱ्या नागरिकांना थोडा आराम मिळाला होता. तर पाऊसला सुरूवात होत असल्याने शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. त्यातच मुंबई आणि नवी मुंबई भागात ही पाऊस (Rain) पडल्याने अनेकांना दिलासा मिळाला होता. तर हवामान विभागाने (Meteorological Department) कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तर विभागाने कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इथे पुढील तीन दिवस पावस पडण्याची शक्यता ही वर्तवली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें