Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याबाबत राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
Raj Thackeray News : राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी आणि नेत्यांना दिलेल्या आहेत.
ठाकरे बंधु एकत्र येण्यासंदर्भात कुठेही बोलू नका, अशा सूचना मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना दिल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत, या संदर्भात कुठेही बोलू नका, अशा सूचना राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी नेत्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता यावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी केली जात होती. त्यानंतर आता खुद्द राज ठाकरे यांनी अशा सूचना दिल्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे.
Published on: Apr 21, 2025 01:23 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

