AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्याकडे... असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय...,'काय म्हणाले राज ठाकरे

आपल्याकडे… असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय…,’काय म्हणाले राज ठाकरे

| Updated on: Jul 25, 2024 | 2:36 PM
Share

आपण एकीकडे आजही पाऊस किती पडणार ? यावेळी जास्त पाऊस पडणार का ? या विषयावर चर्चा करतोय तिकडे परदेशातील लोक इतके पाणी असतानाही किती सावध आहेत ते पाहा असे म्हणत राज ठाकरे यांनी ग्लोबल वार्मिंग विषयाने आपल्या भाषणाची सुरुवात केली.

राज ठाकरे यांच्या पक्षाचा मेळावा आज झाला. यावेळी त्यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले. राज ठाकरे यांनी नुकताच परदेश दौरा केला होता. परदेशात बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला ते हजर राहीले. पुण्यात आलेल्या पुराचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी यावेळी आपल्या भाषणात ग्लोबल वार्मिंग आणि जंगलतोड याविषयावर भाष्य केले. तिकडे परदेशात इतकी जंगले आहेत..कॅनडा आणि अमेरिका यात पाच तलाव आहेत. तिथे देशभरात असंख्य तलाव आहेत. यूरोपातही आहेत. आकाशातून दिसणारे जे पाच तलाव आहेत. त्यात हे पाच तलाव आहे. किती मोठे आहेत हे पाहा. या पाच तलावातील टिंब तुम्ही गुगगलवर पाहा. तिथे टिंब दिसतो. तो नायगरा फॉल्स आहे. जगातील सर्वात मोठा धबधबा हा टिंबासारखा दिसतो. इतके तलाव इतक्या गोष्टी असून इतकं मुबलक पाणी असून ते कागदाने पुसतात. आणि आमच्याकडे पाऊस कधी पडणार, धरणं कधी भरणार. आपल्याकडे दुष्काळ पडेल असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय. माझं असं म्हणणं नाही की कागदावर जा. या सर्व विरोधाभासावर आपण जातो. याचं उत्तर असतं ग्लोबल वार्मिंग. सर्व गोष्टी आपण उलट्या करतो असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Published on: Jul 25, 2024 01:20 PM