युतीसंदर्भात काय ते मी बघेन, तुम्ही.. ; मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान
इगतपुरीत सुरू असलेल्या मनसेच्या शिबिरात राज ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत.
कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी
इगतपुरीत कालपासून मनसेच शिबिर सुरू झालं आहे. या शिबिरात राज ठाकरे युती संदर्भात काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ठाकरे सेनेसोबतच्या युतीबाबत महत्वाच्या सूचना केल्या आहे.
मतदार याद्यांवर बारीक काम करा, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. इगतपुरीमध्ये मनसेच्या शिबिरात त्यांनी या सूचना केलेल्या आहेत. कालपासून हे शिबिर सुरू झालं असून या शिबिरात राज्यभरातून मनसे पदाधिकारी कार्यकर्ते आलेले आहेत. त्याचबरोबर माध्यमांशी काय बोलायला हवं आणि काय नाही, यासंदर्भात देखील राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना धडे दिले आहे. तसंच उद्धव ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात काय निर्णय घ्यायचा तो मी घेईन. त्यावर योग्य वेळी मी बोलेन. तुम्ही काहीही बोलायचं नाही, अशाही महत्वाच्या सूचना राज ठाकरेंनी या शिबिरात दिल्या आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

