Raj Thackeray : राज ठाकरेंनी 2 दिवसांचा नाशिक दौरा 3 तासात गुंडाळला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Raj Thackeray Nashik Tour : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले नियोजित नाशिक आणि पुण्याचे दौरे थोडक्यात गुंडाळले असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. विशेष म्हणजे आजपासून 2 दिवस ते नाशिकच्या दौऱ्यावर असणार होते. मात्र त्यांनी नाशिक शहर आणि ग्रामीणचा आपला हा दौरा अवघ्या तीन तासात उरकता घेतलेला बघायला मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या दौऱ्यानंतर ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र त्यांनी अचानक हा दौरा गुंडाळता घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. राज ठाकरे हे नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी शिवसेना आणि मनसेच्या संभाव्य युतीबाबत चर्चा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, या विषयावर पदाधिकाऱ्यांशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं मनसे नेते दिनकर पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.
Published on: May 26, 2025 06:50 PM
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
