Raj Thackeray : नारळीकरांना श्रद्धांजली, राजकारण्यांच्या कानपिचक्या; राज ठाकरेंचं ट्विट चर्चेत
Raj Thackeray Tribute Jayant Narlikar : जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर राज ठाकरेंनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत राजकारण्यांचे कान टोचले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. ही श्रद्धांजली वाहताना राज ठाकरे यांनी राजकारण्यांना देखील कानपिचक्या दिल्या आहेत. विज्ञानात एखाद्याने थिअरी खोडून काढली म्हणून कोणी कोणाच्या अंगावर जात नाही. उलट नव्या प्रेरणेने त्याचा विचार सुरू होतो. असं राजकारणात कधी होईल कोण जाणे, असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचं आज पुण्यात निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर प्रत्येक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राज ठाकरे यांनी देखील जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याबद्दल आपल्या एक्स आकाऊंटवरून त्यांनी एक ट्विट केलेलं आहे. आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरेंनी म्हंटलं आहे की, डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या गुरूंनी विज्ञानाच्याच अशा एका कल्पनेला आवाहन दिलं आणि एक नवा सिद्धांत मांडला. विज्ञानात एक बरं असतं, एखाद्याने एखादी थेअरी खोडून काढली म्हणजे कोणी कोणाच्या अंगावर धावून जात नाही. उलट नव्या प्रेरणेने त्याचा विचार सुरू होतो. असं राजकारणात कधी होईल कोण जाणे. विज्ञानाला साखरेचं कोटींग देणारे सिद्धहस्त लेखक, शास्त्रज्ञ आज आपल्यातून गेले. अशा माणसांची उणीव नक्की भासेल, असं ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.