Raj Thackeray : … तरच टाळी देणार, युतीसाठी राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना नवी अट काय?
जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. ते होईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतर आता ठाकरे बंधूंची युती कधी होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा चांगल्याच सुरू आहेत. अशातच मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंसोबत युती कधी करणार या प्रश्नावर बोलताना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. ते होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अशातच राज ठाकरे यांच्याकडून युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी एक नवी अट घातली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेसचा हात सोडाल तरच टाळी देणार असं राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरें यांना सांगितलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वकांक्षांना आळा घालण्यासाठी भाजपकडून खेळी सुरू आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. तर मातोश्री आणि शिवतीर्थ एकत्र येण्याच्या प्रयत्नांना भाजपकडूनही हवा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

