AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना, 1 ऑगस्टला... असं काय घडलं?

मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना, 1 ऑगस्टला… असं काय घडलं?

| Updated on: Jul 27, 2026 | 11:54 AM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सोशल मीडियावरील पोस्टद्वारे देण्यात आली आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातील पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात आगामी संघटनात्मक वाटचाल, पक्षाची भूमिका आणि पुढील नियोजनाबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करण्याची करणार आहेत.

सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टमध्ये कार्यक्रमाची वेळ, ठिकाण आणि वर्धापन दिनाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी सर्व विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांना याबाबत तातडीच्या सुचनाही दिल्या आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. राज ठाकरे आपल्या भाषणातून कोणते मुद्दे मांडणार आणि आगामी राजकीय घडामोडींवर काय भूमिका मांडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Published on: Jul 27, 2026 11:54 AM

Follow Us