राज – उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय झाली चर्चा? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शिवसेना उबाठा गट प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून त्यासाठी आपल्या मोठ्या भावाला शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट दिली.
बरंच काही घडलं. दोन भाऊ भेटले. एकमेकांना प्रेमाचं अलिंगण दिलं. गप्पा झाल्या. शिवसेना प्रमुखांच्या खोलीत व्यंगचित्रावर चर्चा झाली, असं म्हणत संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली. आज शिवसेना उबाठा गट प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून त्यासाठी आपल्या मोठ्या भावाला शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट दिली. तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवर आल्याने यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघायला मिळाला.
या भेटीच्या वेळी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल 20 मिनिट चर्चा झाली. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी स्वत: उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे मातोश्रीच्या प्रवेश द्वारावर आल्यानंतर दोन्ही भावांची भेट झाली. यावेळी राज ठाकरेंनी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देऊन उद्धव ठाकरेंना आलिंगन देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मातोश्रीमध्ये या दोन्ही भावांमध्ये चर्चा झाली. यानंतर संजय राऊत यांनी या चर्चेविषयी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बऱ्याच चर्चा झाल्या. दोन भाऊ भेटले, दोन नेते भेटले नाहीत. दोन भाऊ आहेत. भेटणं गरजेचं आहे. भेटले. आले. नातं दृढ होत आहे. होतंच. आम्हाला त्याचा आनंद आहे. जे होईल ते चांगलंच होईल.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा

