तब्बल 3 तास कौटुंबिक भेट की राजकीय चर्चा! मातोश्रीवर ठाकरे बंधूंमध्ये काय घडलं?
राज ठाकरे यांनी आईसह 20 वर्षांनंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या कौटुंबिक भेटीत ठाकरे बंधूंनी स्नेहभोजन केले. जयवंती देशपांडे आणि त्यांच्या कुटुंबासह राज ठाकरे उपस्थित होते. मागील तीन महिन्यांतील ही ठाकरे बंधूंची सातवी भेट असून, त्यांच्यातील कौटुंबिक संबंध सुधारल्याचे यातून दिसून येते.
राज ठाकरे यांनी 20 वर्षांनंतर त्यांच्या आईसह मातोश्री निवासस्थानी भेट दिली. या भेटीदरम्यान, ठाकरे कुटुंबीयांचे स्नेहभोजन झाले. राज ठाकरेंनी सकाळी 12 वाजता माहीम येथील एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावून, त्यानंतर आपल्या निवासस्थानी जाऊन आईला सोबत घेऊन ते मातोश्रीवर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत बहीण जयवंती देशपांडे, त्यांचे पती अभय देशपांडे आणि मुलगा यश देशपांडे हे देखील होते.
ही भेट कौटुंबिक स्वरूपाची असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील तीन महिन्यांत ठाकरे बंधूंमध्ये ही सातवी भेट आहे. 5 जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधी मेळाव्यात दोन्ही ठाकरे प्रथमच एकत्र आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 27 जुलैला राज ठाकरे मातोश्रीवर गेले, तर 27 ऑगस्टला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले आणि 5 ऑक्टोबरला संजय राऊतांच्या नातवाच्या बारशात आणि त्याच दिवशी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. 12 ऑक्टोबरची ही भेट ठाकरे बंधूंमधील संबंध अधिक दृढ करत असल्याचे दिसत आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

