रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
राज ठाकरे यांनी 225 ते 250 जागी उमेदवार देण्याची मनोदय बोलून दाखविला होता. परंतू प्रत्यक्षात राज ठाकरे यांनी भाजपाच्या खालोखाल उमेदवार दिले आहेत.आता राज ठाकरे यांच्या प्रचार सभा सुरु होणार आहेत.
राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात भाषण करताना आपण विधानसभेला 225 ते 250 जागा लढविणार असल्याचे सुतोवाच केले होते. परंतू त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आणि इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. राज ठाकरे विधानसभे सर्वात जास्त उमेदवार उभे करील असे म्हटले जात होते. परंतू प्रत्यक्षात तसे झालेले नाही. विधानसभेसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या 29 ऑक्टोबर या तारखेपर्यंत मनसेचे 135 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणार उतरवले आहेत. तरी देखील भाजपाच्यानंतर मनसेचे सर्वाधिक उमेदवार आहेत. मागच्या दोन विधानसभा निवडणूकांत मनसेला यश मिळाले नव्हते. आता मनसेचे किती उमेदवार निवडून येतात यावर राज ठाकरे यांचे राजकारण ठरणार आहे. राज ठाकरे आता प्रचाराची सुरुवात करणार आहेत. राज ठाकरे यांची येत्या 5 नोव्हेंबरला वणी येथे सभा होणार आहे. तर 6 तारखेला मंगळवेढा येथे सभा होणार आहे. पंढरपूर- मंगळवेढाचे उमेदवारी दिलीप धोत्रे यांच्यासाठी राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे. वणी येथे मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्यासाठी ही प्रचार सभा असणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

