“..त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो”, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील राजकीय परिस्थितीवर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. "एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो," असं राज ठाकरेंनी ट्विट केलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 30, 2022 | 2:15 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील राजकीय परिस्थितीवर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. “एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो,” असं राज ठाकरेंनी ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून ज्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवली ती केवळ नशिबाच्या जोरावर होती आणि उद्धव यांनी काहीही साध्य केलं नाही, असं त्यांनी या ट्विटमधून अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे. 2005 मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षानंतर राज ठाकरेंनी पक्ष सोडला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी राजीनामा दिला. त्यामुळे बुधवारी रात्री महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें