किरीट सोमय्या यांचे आरोप खरे? कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून ‘ही’ मोठी कारवाई
VIDEO | 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले 'ते' आरोप ठरले खरे? बघा व्हिडीओ
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस आणि इतरांनी कागदांची फेरफार करून कंत्राट घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक केली असून राजीव साळुंखे आणि सुनील कदम असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी या घोटाळ्याशी संबंधित अहवाल महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी सादर केला होता. या अहवालात भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करण्यात आलं होतं. पण कोणतीही कारवाई करू नये, अशी शिफारस करण्यात आली होती, तर याप्रकऱणी सुनील धामणे यांचीच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती, एकाच स्टॅम्प पेपरवर महापालिकेने दोन करार केल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आल्याने महापालिकेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही केली होती.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?

