50 खोके घेणाऱ्यांनी शेतकरी आंदोलनावर टीका करू नये; राजू शेट्टी यांचं कुणावर टीकास्त्र?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केलीय. पाहा...
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. सांगलीसह अनेक मार्गांवर स्वाभिमानीच्या नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. सांगली ते कोल्हापूर रोडवर अंकली टोल नाक्यावर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केलीय. 50 खोके घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करू नये. नेमकी स्टंटबाजी कोण करतंय हे पुढील काळात कळेल, असा टोला राजू शेट्टी यांनी मंत्री उदय सामंत यांना लगावला आहे.
Published on: Feb 22, 2023 03:07 PM
Latest Videos
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?

