Raju Shetti | राज्यपालांनी जो निर्णय घ्यायचाय तो घ्या, मला काहीही फरक पडत नाही : राजू शेट्टी

Raju Shetty | आमदारकीच्या 12 जणांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा पत्ता कट होण्याची चर्चा सुरु झालीय. 

राज्यपालांनी जो निर्णय घ्यायचाय तो घ्या, मला काहीही फरक पडत नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले. पमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान, आमदारकीच्या 12 जणांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा पत्ता कट होण्याची चर्चा सुरु झालीय.

आपण याबाबत कधीच पाठपुरावा केला नाही. आपल्याला यात फारसा सर राहिलेला नाही. राज्यपालांनी जो काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, मला फरक पडत नाही. माझ्यावर ईडीची कारवाई होत नाही. इतर कोणतीही कारवाई करता येत नाही म्हणून त्यांचा आक्षेप असेल. मी काही दरोडा घातला नाही. जनतेच्या प्रश्नावर गुन्हे दाखल झाले त्याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी आमदारकीच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या चर्चेबाबत प्रतक्रिया दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI