ED सारख्या संस्था राजकीय कार्यकर्त्यांसारखे वागताहेत, Raju Shetti यांचा हल्लाबोल

ऊसाला टनाला 3700 रुपये भाव देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. नाशिकमध्ये उत्पादन खर्चापेक्षा ऊस कमी किमतीत मिळतो. सांगली, कोल्हापूर, सातारा यापेक्षा नगरची स्थिती वेगळी नाही. मात्र, टनामागे पंधराशे रुपयांचा फरक पडतो, असं शेट्टी म्हणाले. तसंच भ्रष्टाचाराचा आरोप झालेले कारखाने चौकशी करुन सुरु करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर राजू शेट्टी यांनी कारखान्यांच्या चौकशीवरुन भाजपवरही निशाणा साधलाय.

ऊसाला टनाला 3700 रुपये भाव देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. नाशिकमध्ये उत्पादन खर्चापेक्षा ऊस कमी किमतीत मिळतो. सांगली, कोल्हापूर, सातारा यापेक्षा नगरची स्थिती वेगळी नाही. मात्र, टनामागे पंधराशे रुपयांचा फरक पडतो, असं शेट्टी म्हणाले. तसंच भ्रष्टाचाराचा आरोप झालेले कारखाने चौकशी करुन सुरु करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

साखरेचा क्विंटलमागे 400 ते 500 रुपये भाव वाढला आहे. इथेनॉलचे भाव वाढले आहेत. साखरेला चांगले दिवस आले, मात्र नाशिकच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता येत नाही. द्राक्ष पिकांचंही अवकाळीनं नुकसान झालं. आता छाटणी कधी करायची असा प्रश्न बागायतदारांसमोर आहे. छाटणी केली तरी पाऊस पडतो, नाही केली तरी पडतो. बाहेरचे व्यापारी गायब होण्याच्या घटनाही घडतात. अशा व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी काही तरतूद नाही. त्यामुळे परवानाधारक व्यापाऱ्यांनाच खरेदी करायला परवानगी देण्याची मागणीही शेट्टी यांनी केलीय. तसंच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष परिषद घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय.

त्याचबरोबर राजू शेट्टी यांनी कारखान्यांच्या चौकशीवरुन भाजपवरही निशाणा साधलाय. साखर कारखान्यांमध्ये गैरव्यवहार होत असेल तर कारवाई झाली पाहिजे. काही कारखान्यांची चौकशी होते. पण भाजपमध्ये आले त्यांची चौकशी होत नाही. जे भाजपमध्ये येत नाहीत त्यांची मात्र चौकशी होती, अशा शब्दात शेट्टी यांनी भाजपवरही निशाणा साधलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI