Special Report | मविआच्या गणिताचा नेमका घात कुणी केला ?

संजय राऊत यांनी सहापैकी तीन आमदारांची आपल्याला मतं मिळाली नाहीती त्यांची नावं त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत घेतली आहेत. त्यापैकी मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, माळशिरसचे अपक्ष आमदार संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंदे यांची आपल्याला मतं मिळालीच नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

महादेव कांबळे

|

Jun 11, 2022 | 9:30 PM

राज्यसभा निवडणुकीत भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तर भाजपने पलटवार करत संजय राऊत यांनी आत्मपरिक्षण करावं असं म्हटले आहे. महाविकास आघाडीची बैठक ट्रायटंड हॉटेलच्या मागे घोड्यांचे चित्र होते. आणि योगायोगाने या निवडणुकीत घोडेबाजारांनीच सुरुवात करण्यात आली. तर राज्यसभेच्या निवडणुकीचा शेवटही घोडेबाजारानीच झाला असल्याचे म्हटले गेले आहे. यावेळी खासदार संजय राऊत यांनी भाजपवरही जोरदार टीका केली आहे. या घोडेबाजारामुळे राज्यातील सरकारला काहीही धोका होणार नाही असंही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. संजय राऊत यांनी सहापैकी तीन आमदारांची आपल्याला मतं मिळाली नाहीती त्यांची नावं त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत घेतली आहेत. त्यापैकी मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, माळशिरसचे अपक्ष आमदार संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंदे यांची आपल्याला मतं मिळालीच नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें