Ramdas Kadam : पुरावा दाखवत कदमांनी अनिल परबांचा काढला बाप, काय केला सनसनाटी आरोप?
रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर प्रेमनगर प्रकल्पात 8,000 मराठी कुटुंबांना विस्थापित केल्याचा गंभीर आरोप केला आहे. कदम यांच्या मते, परब यांनी धमक्या देऊन भूखंड खाली करून घेतला, परंतु आठ वर्षांपासून ना भाडे, ना भूखंड, ना फ्लॅट दिले. त्यांनी या आरोपांच्या समर्थनार्थ स्थानिक रहिवाशांची प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत, ज्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नमूद आहे.
माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर प्रेमनगर प्रकल्पातील कथित घोटाळ्यावरून गंभीर आरोप केले आहेत. रामदास कदम यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यामार्फत कदम कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतकंच नाहीतर कदमांनी अनिल परब यांच्यावर प्रेमनगरमधून 8,000 मराठी लोकांना विस्थापित केल्याचा आरोप केला.
रामदास कदम यांनी दावा केला की, अनिल परब यांनी शाखेत बसून लोकांना दमदाटी करून घरे खाली करण्यास सांगितले होते, तसेच त्यांना फ्लॅट आणि भाडे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आठ वर्षे उलटूनही विस्थापित कुटुंबांना ना भाडे मिळाले, ना भूखंड, ना फ्लॅट. कदम यांनी परब यांच्या भूमीपूजनावेळी उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या प्रकरणात त्यांचा संबंध नसल्याचा परब यांचा दावा खोटा असल्याचे म्हटले. त्यांनी स्थानिक लोकांची प्रतिज्ञापत्रे (अॅफीडेव्हीट) सादर करत, अनिल परब आणि संजय कदम यांनी या प्रकल्पातून कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप केला आहे. स्थानिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

