AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Kadam : नराधम, नीच, भाडखाऊ... कदमांचा संताप अनावर, परबांवर खळबळजनक आरोप अन् काढली औकात

Ramdas Kadam : नराधम, नीच, भाडखाऊ… कदमांचा संताप अनावर, परबांवर खळबळजनक आरोप अन् काढली औकात

| Updated on: Oct 05, 2025 | 4:33 PM
Share

रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रेम नगर प्रकल्पातील कथित कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारात परब यांचा सहभाग असल्याचा दावा कदम यांनी केला. परब यांनी बिल्डरकडून मर्सिडीज घेतल्या आणि मराठी माणसांना विस्थापित केले, असा आरोप करत कदम यांनी परब यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या दिवसांबाबतच्या विधानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेना उबाठा नेते अनिल परब यांच्यावर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली आहे. कदम यांनी परब यांच्यावर प्रेम नगर प्रकल्पात कोट्यवधी रुपये कमावल्याचा आणि बिल्डरकडून मर्सिडीज गाड्या घेतल्याचा आरोप केला. या प्रकरणात ८,००० मराठी कुटुंबांना विस्थापित करण्यात आले, असा दावा त्यांनी केला.

यासह अनिल परब यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या दिवसांबाबत केलेल्या विधानावरही रामदास कदम यांनी जोरदार आक्षेप घेतला. बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतिम क्षणी फक्त आपण एकटेच उपस्थित होतो आणि अनिल परब यांचे दावे धादांत खोटे असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले आहे. त्यांनी अनिल परब यांच्या बोलण्याची औकात नसल्याचे म्हणत, या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

Published on: Oct 05, 2025 04:33 PM