Shivsene : …तेव्हा 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो अन् सगळं.., बाळासाहेबांच्या निधनावरून रामदास कदमांचा संतप्त सवाल
दासरा मेळाव्यात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना राजकारणातून कायमचे उद्ध्वस्त करण्याचे आवाहन केले. बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला होता आणि त्यांच्या हाताचे ठसे का घेतले, असे गंभीर प्रश्न कदम यांनी उपस्थित केले.
अलीकडे झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरेंना राजकारणातून कायमचे उद्ध्वस्त करा, असे खुले आवाहन कदम यांनी यावेळी केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घडलेल्या काही घटनांवरही त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रामदास कदम यांनी विचारले की, “बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस का ठेवण्यात आला होता?” तसेच, “बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले होते?” असे सवाल त्यांनी केले. मातोश्रीमध्ये नेमके काय चालले होते, याची आपल्याला माहिती होती, असेही कदम यांनी सांगितले. त्यांनी दावा केला की, “आम्ही आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो आणि सगळं कळत होतं.” आपण शिवसेनेसाठी तुरुंगवास भोगला आहे आणि शिवसेना मोठी केली आहे, असे सांगत, आता आम्हाला संपवण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवालही त्यांनी केला.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

