सुभाष देसाई देसाई कॅबिनेटमध्ये झोपा काढणार माणूस; रामदास कदम यांची टीका

प्रत्येक बैठकीत झोपा काढणारा माणूस आज बोलायला लागला सुभाष देसाई यांनी तोंड उघडले याचे मला आश्चर्य वाटते. देसाई कॅबिनेमध्ये झोपा काढणार माणूस अशी खरमरीत टीका रामदास कदमांनी केली आहे.

वनिता कांबळे

|

Aug 03, 2022 | 8:32 PM

मुंबई : शिंदे गटाचे आमदार उदय सामंत(Uday samant) यांच्या वाहनावर मंगळवारी पुण्यात कात्रज चौकात हल्ला करण्यात झाला. त्यांच्या कारची काच देखील फोडण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी कारवाई सुरु केली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता  राजकीय प्रतिक्रिया येत आहे. यावर शिवसेना नेते सुभाष देसाई(Subhash Desai ) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रिये नंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam)यांनी देसाईंवर निशाणा साधला आहे.  प्रत्येक बैठकीत झोपा काढणारा माणूस आज बोलायला लागला सुभाष देसाई यांनी तोंड उघडले याचे मला आश्चर्य वाटते. देसाई कॅबिनेमध्ये झोपा काढणार माणूस अशी खरमरीत टीका रामदास कदमांनी केली आहे. उदय सांमत आणि एकनाथ शिंदे यांनी आशा भ्याड हल्ल्याकडे लक्ष देऊ नये. आपल्या मतदार संघात आणि महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यावे असा सल्लाही रामदास कदम यांनी दिला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें