Breaking : शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवली जाणार, उदय सामंतांवरील हल्ल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

उदय सामंतांवरील हल्ल्याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उदय सामंत यांच्यावरील हल्ल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.

Breaking : शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवली जाणार, उदय सामंतांवरील हल्ल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 5:41 PM

मुंबई : एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर पुण्यातील कात्रज मध्ये शिवसैनिकांनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली. सामंत यांच्याकडून कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. महत्त्वाचं बाब म्हणजे या हल्ल्याचं समर्थन शिवसेनेच्याच काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचे काही नेते अजूनही चितावणीखोर वक्तव्य करत आहेत. या हल्ल्याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उदय सामंत यांच्यावरील हल्ल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा (MLA Security) वाढवण्यात येणार आहे. आधीच या आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आलीय. आता त्या सुरक्षेत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला प्रकरणात पुणे कोर्टानं पाच जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यात शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात तसेच शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांचाही समावेश आहे. उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ला शिंदे आणि ठाकरेंमधील दरी अधिक वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे. कारण या हल्ल्यानंतर आता दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका आणि आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

सहनशिलतेचा अंत पाहू नका, सामंतांचा इशारा

कात्रजमध्ये आपल्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर उदय सामंत यांनी मंगळवारी रात्रीच पोलीस तक्रार दिली. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सामंत म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे काहीजण सांगत आहेत की त्यांनी माझा ताफा अडवला. ते धादांत खोटं आहे. माझी गाडी सिग्नलला थांबली होती. मी कुठेही घाई न करता मी तिथे थांबलो होतो. माझ्या बाजूला दोन गाड्या येऊन थांबल्या. त्या गाड्यातून दोन पांढरे शर्ट घातलेले युवक उतरले. एकाच्या हाता. बेस बॉलची स्टिक होती, एकाच्या हातात दगड बांधलेला होता. मला ते समोर येऊन शिव्या घालत होते आणि दुसऱ्या बाजूला एक 50 – 60 जणांचा मॉब होता. डाव्या बाजूला एसपीओ माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो होते. त्याबाजूला दुसरे दोन पांढरे शर्ट घातलेले युवक होत, त्यांच्या हातात सळईसारखं काही होतं, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.

‘या हल्ल्यानं आम्ही होतो त्यापेक्षा जवळ आलो’

असा भ्याड हल्ला करुन कुणाला वाटत असेल की मी शिंदे साहेबांची साथ सोडेन, आमचे 45 लोक शिंदे साहेबांची साथ सोडतील, तर आज या हल्ल्यानं आम्ही होतो त्यापेक्षा जवळ आलो आहोत. असे भ्याड हल्ले करुन उदय सामंत थांबणारा नाही. कुठल्याही प्रसंगाला समोरा जाणारा आहे. कुणावर टीका करत नाही, त्याचा अर्थ मी हतबल नाही. आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नये, असा इशाराच सामंत यांनी हल्लेखोरांना दिलाय.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.