Ramdas Kadam : ‘आम्ही कष्टानं उभी केलेली शिवसेना कोसळताना वाईट वाटतं’, रामदास कदम भावूक; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
कदमांच्या भावनिकतेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केलीय. जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जे जे मिळालं ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्ही समोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला? अशा शब्दात रामदास कदमांवर निशाणा साधलाय.
राज्यात शिवसेना दुभंगली असताना आता केंद्रातही शिवसेनाला मोठा हादरा बसलाय. शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. अशावेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिलाय. माध्यमांशी संवाद साधताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले. आजही माझ्यासमोर बाळासाहेब आहेत. आम्ही कष्टानं उभी केलेली शिवसेना कोसळताना वाईट वाटत असल्याचं कदम म्हणाले. त्यावेळी ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, कदमांच्या भावनिकतेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केलीय. जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जे जे मिळालं ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्ही समोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला? अशा शब्दात रामदास कदमांवर निशाणा साधलाय.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन

