
आम्ही नव्हे, उद्धव ठाकरे तुम्हीच गद्दार!; रामदास कदम यांचे गंभीर आरोप
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : तुम्हाला धनुष्यबाण मिळूच शकत नाही. कारण तुमचे हात भ्रष्टचाराने बरबटलेले आहेत. गद्दार, बेईमान चोर, खोके, असं तुम्ही म्हणता. तुमचेच हात बरबटलेले आहेत, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
शिवसनेचे नेते रामदास कदम यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्रा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. बाहेरून लोकांना आणलं. आम्ही रामदास कदमच्या बालेकिल्ल्यात सभा घेतल्याचं समाधान फक्त त्यांनी घेतलं, असं रामदास कदम म्हणाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? बाळासाहेबांनी सर्वसामान्य माणसाला मोठं केलं. तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या विचारांशी बेईमानी केली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलात. त्यामुळे खरी गद्दारी ही तुम्ही केली, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे
Published on: Mar 06, 2023 11:22 AM
Related Video
मोबाईल युजरची दिवाळी, रिचार्ज प्लान होणार तब्बल 50 टक्क्यांनी स्वस्त
शिंदेंचा फोन अन् अरबाज शेखला मोठा दिलासा, त्या हॉस्पिटलचा मोठा निर्णय
Shraddha Walkar हत्याकांड : आरोपीचा MA चा पेपर, सुनावणी पुढे ढकलली
श्रेयस अय्यरच्या बहिणीने आता काय केलं? एका कृतीमुळे सोशल मीडियावर खळबळ
पुण्यातून धावणार बुलेट ट्रेन, या बड्या शहराला जोडणार
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..