VIDEO : Subhash Desai यांना मंत्रिपद दिलं, मला नाही, वाईट वाटलं-Ramdas Kadam
आम्हा ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद देऊ नका असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानंतरही सुभाष देसाई यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्याचं दु:ख झालं. देसाईंना मंत्रिपद द्यायला नको होतं, अशी खदखद शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली.
आम्हा ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद देऊ नका असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानंतरही सुभाष देसाई यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्याचं दु:ख झालं. देसाईंना मंत्रिपद द्यायला नको होतं, अशी खदखद शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली. कदम यांनी ही खदखद व्यक्त करतानाच अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावरही सवाल केला आहे. रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप खोडून काढतानाच अनिल परब यांच्यामुळे पक्ष रसातळाला जात असल्याचंही स्पष्ट केलं. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. आमचे वय 60-70 वर्ष झाली आहेत. आता आम्हाला मंत्रिपद देऊ नका, असं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

