राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
राजकारणात रोज काहीना काही वेगळं घडतंच असतं. अशात पुन्हा राणा दाम्पत्याचं नाव चर्चेत आलं आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्रिणी सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेवरील रिक्त जागेसाठी भाजपच्या नवनीत राणांची वर्णी लागेल की काय अशी चर्चा होती.
राजकारणात रोज काहीना काही वेगळं घडतंच असतं. अशात पुन्हा राणा दाम्पत्याचं नाव चर्चेत आलं आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्रिणी सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेवरील रिक्त जागेसाठी भाजपच्या नवनीत राणांची वर्णी लागेल की काय अशी चर्चा होती. मात्र काही अटीतटीमुळे ती जागा नवनीत राणा यांच्याकडून मुकली. राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना संधी मिळताच या सर्व चर्चेंना पूर्णविराम लागला. आता पुन्हा राणा दांपत्याच्या चर्चेत येण्याचं कारण काही वेगळंच आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी अमरावतीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच काळ चर्चा झाली. ही भेट अमरावतीत कार्यालयात झाल्याचंही सांगितलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही भेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर होत असल्याचं वृत्त आहे. अमरावती हा भाग राणा यांचा बालेकिल्ला देखील मानला जातो.
राजकारणात बड्या नेत्यांच्या भेटीगाठींनंतर काहीतरी मोठं घडण्याची शक्यता बळावते. त्यामुळे या भेटीलाही विशेष महत्त्व आलं आहे.
Published on: Jun 13, 2026 10:45 AM
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर

