Ranveer Singh: रणवीर सिंग अडचणीत, सामाजिक कार्यकर्ते पोलिसांत दाखल करणार तक्रार, न्यूड फोटोशूट प्रकरण
गेल्या काही दिवसांपासून त्याच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले. मुंबईतील चेंबूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याच्या फोटोशूटने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. न्यूड फोटोशूटप्रकरणी अभिनेता रणवीर सिंग चांगलाच अडचणीत सापडला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून मुंबईतील चेंबूर पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय संस्कृतीला धक्का पोहोचवल्याचा आरोप या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. ‘पेपर’ (Paper) या मासिकाच्या कव्हर पेजसाठी रणवीरने न्यूड फोटोशूट (nude photoshoot) केलं होतं. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर विविध प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. अनेकांनी त्यावर मीम्ससुद्धा व्हायरल केले. रणवीरच्या या फोटोशूटच्या वादामध्ये समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनीही उडी घेतली. सोलापूरमध्ये बोलताना अबू आझमी म्हणाले की, “रणवीर सिंहने काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. त्याने नंगानाच केला तरी आम्हाला काही अडचण नाही. मात्र, जे लोक हिजाब घालतात त्यांना या देशात विरोध कसा होऊ शकतो? हिजाब परिधान करणाऱ्यांना ठिकठिकाणी अडवलं जात आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

