टीईटी प्रकरणातील आरोपी तुकाराम सुपेंच्या घरात 2 कोटींपेक्षा अधिक रक्कम पोलिसांच्या हाती
पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरावर आणि त्याच्या मेव्हण्याच्या घरावर छापा टाकला. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरातून 2 कोटी आणि सोनंही सापडलं असल्याची माहिती आहे.
पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) चौकशीत आरोग्य भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर तपास सुरु केला होता. त्या दरम्यान त्यांना म्हाडा परीक्षेचा पेपर फोडला जाणार असल्याची लिंक लागली. याचा तपास करताना महाटीईटी (MahaTET) परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचं समोर आलं. पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरावर आणि त्याच्या मेव्हण्याच्या घरावर छापा टाकला. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरातून 2 कोटी आणि सोनंही सापडलं असल्याची माहिती आहे.
Published on: Dec 20, 2021 1:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
