WITT Global Summit : …तर अर्धी इंडस्ट्री नष्ट होईल, नेपोटिझमवर रवीना टंडन हिचं वक्तव्य अन् लगावला खोचक टोला
टीव्ही 9 नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या ग्लोबल समीट आजपासून सुरू झाले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन सहभागी झाली होती. यावेळी तिने नेपोटिझमवरही भाष्य केले.
नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या ग्लोबल समीट आजपासून सुरू झाले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन सहभागी झाली होती. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या कार्यक्रमादरम्यान रवीना टंडनला अनेक प्रश्न विचारण्यात आले. रवीनाने सर्व प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली आणि अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. यावेळी तिने नेपोटिझमवरही भाष्य केले. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ती म्हणाली, जर तुम्ही नेपो किड्सबद्दल बोललात तर आपले अर्धे राजकीत वर्तुळ आणि अर्धे फिल्म इंडस्ट्री नष्ट होईल. यावेळी तिने तिच्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीबद्दल भाष्य केले. मी प्रल्हाद कक्करला असिस्ट करत असल्याचे तिने सांगितले. प्रत्येकजण मला सांगत होता की तुला पडद्याच्या मागे नाही तर पडद्यासमोर यावं लागेल. यानंतर एक दिवस रवीनाला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर आली आणि तिने हो म्हटलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

