Ravindra Dhangekar : पुण्यातील गुन्हेगारीवर बोलल्याने धंगेकरांवर मोक्काची तयारी, काय केला मोठा गौप्यस्फोट?
पुण्यातील गुंडगिरीवर उघडपणे बोलल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात मंत्री चंद्रकांत पाटलांमार्फत मोक्का (MCOCA) लावण्याची तयारी सुरू असल्याचा गौप्यस्फोट धंगेकरांनी केला आहे.
पुण्यातील गुंडगिरी आणि फरार गुंड निलेश घायवळ यांच्या प्रकरणात आवाज उचलणारे आमदार रवींद्र धंगेकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्यावर मंत्री चंद्रकांत पाटलांमार्फत मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्याची तयारी सुरू असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. धंगेकर यांच्या मते, त्यांच्या पोलीस खात्यातील मित्रांनी त्यांना सावध केले असून, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.
धंगेकरांनी कोथरूडचे आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील आणि समीर पाटील यांच्यावरही आरोप केले आहेत. निलेश घायवळची टोळी समीर पाटील चालवत असल्याचा उघडपणे आरोप धंगेकरांनी केला आहे. याशिवाय, चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात लुडबुड करणारा समीर पाटील १०० कोटींचा मालक कसा झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपने मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीण दरेकर यांनी धंगेकरांना आवर घालण्याची गरज व्यक्त केली, तर सुधीर मुनगंटीवार यांनी धंगेकर हे गुंडांच्या विरोधात बोलले असून भाजपच्या विरोधात नाही, असे स्पष्ट केले.
पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्...
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्...
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?

