Ravindra Dhangekar : मला टार्गेट करण्यापेक्षा… धंगेकरांचं महायुतीच्या नेत्यानांच थेट चॅलेंज अन् अजितदादांना लगावला टोला
निलेश घायवळ प्रकरणामुळे पुण्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी रवींद्र धंगेकरांनी भाजप नेते चंद्रकांत पाटलांवर आरोप केले. यामुळे महायुतीत फूट पडल्याचे दिसत आहे.
पुण्यात निलेश घायवळ प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. बनावट पासपोर्ट काढून परदेशात पळून गेलेल्या निलेश घायवळमुळे सुरू झालेल्या या वादामुळे महायुतीमध्येच मतभेद निर्माण झाले आहेत. रवींद्र धंगेकरांनी भाजप नेते चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केले, ज्यात त्यांनी पाटलांच्या कार्यालयातील समीर पाटील यांचे घायवळशी संबंध असल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर महायुतीमधील नेते, विशेषतः अजित पवार यांनी धंगेकरांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या “बॉस” एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. यावर धंगेकरांनी त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत, निलेश घायवळवर बोला, मला का टार्गेट करताय? असा सवाल केला.
पुणेकरांचा आवाज म्हणून गुन्हेगारीवर बोलत राहणार असल्याचे धंगेकरांनी स्पष्ट केले. अजित पवारांच्या प्रशासनावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी धंगेकरांना पाठिंबा दिला आहे, तर सुप्रिया सुळे यांनी तर हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यापर्यंत नेणार असल्याचे म्हटले आहे. पुणे पोलिसांनी निलेश घायवळ विरोधात इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

