दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!
काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोपांवरून सरकारवर तीव्र टीका केली. आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतानाही दिल्लीत महिला सुरक्षित का नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला. सरकार चोर, ढीठ आणि निकम्मे असल्याचा आरोप करत, चौधरी यांनी लोकशाहीच्या सन्मानासाठी संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे म्हटले.
नवी दिल्ली: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि खासदार रेणुका चौधरी यांनी दिल्लीत एका आंदोलनादरम्यान सरकारवर जोरदार हल्ला चढवला. निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराप्रकरणी चर्चेत असलेल्या ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. “ज्ञानेश कुमार यांचे पितळ उघडे पडले असतानाही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, कारण हे चोर आणि ढीठ आहेत,” अशी तीव्र टीका चौधरी यांनी केली.
यावेळी बोलताना, दिल्लीत आंदोलनांसाठी मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात केले जाते, पण त्याच शहरात महिला सुरक्षित का नाहीत, असा मूलभूत प्रश्न त्यांनी विचारला. “जर सरकारकडे एवढे मनुष्यबळ आणि ताकद असेल, तर त्यांनी प्रथम महिला सुरक्षा सुनिश्चित करावी,” असे त्या म्हणाल्या. लोकशाही आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. चौधरी यांनी लोकशाही सन्मानासाठी आपला संघर्ष सुरूच ठेवण्याचे आवाहन केले.
Published on: Oct 06, 2026 03:37 PM
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?

