Pune | पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रवर भरदिवसा दरोडा, शिरुरच्या पिंपळखेडमधली घटना

पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांची अजिबात भीती राहिलेली नाही. हे वारंवार विविध घटनांमधून समोर येतंय.

पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांची अजिबात भीती राहिलेली नाही. हे वारंवार विविध घटनांमधून समोर येतंय. आतादेखील अशीच घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात भर दिवसा चक्क महाराष्ट्र बँकेवर दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत बँकेतील लाखो रुपयांची रोख रक्कम आणि कोट्यवधींचे सोने लंपास केले आहे. संबंधित घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI