Rohit Arya : रोहित आर्याने अभिनेत्री रुचिता जाधवलाही केला होता संपर्क, काय झालं बोलणं ?
रोहित आर्याने अभिनेत्री रुचिता जाधवला एका चित्रपट प्रकल्पासाठी संपर्क साधला होता. ४ ऑक्टोबर रोजी त्याने तिला मेसेज केला होता. हॉस्टेज ठेवलेल्या मुलींवर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथा त्याने रुचिताला फोनवर सांगितली. २८ ऑक्टोबर रोजी आर ए स्टुडिओमध्ये भेट ठरली होती, परंतु रुचिताच्या सासऱ्यांच्या तब्येतीमुळे ती भेट रद्द करावी लागली.
पवईतील ओलीस नाट्यामुळे चर्चेत आलेला आणि एन्कांऊटरमध्ये मारला गेलेला रोहित आर्या याने अभिनेत्री रुचिता जाधवला एका चित्रपट प्रकल्पासाठी संपर्क साधला होता अशी माहिती समोर आली आहे. रुचिता जाधवने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या घटनेची पुष्टी केली आहे. रोहित आर्याने 4 ऑक्टोबर रोजी रुचिता जाधवला एक इंग्रजी मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये त्याने एका नवीन चित्रपटाबद्दल चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोघांमध्ये संपर्क साधण्याचे ठरले. मात्र काही कारणांमुळे त्यांची मीटिंग होऊ शकली नाही. रोहितशी काय बोलणं झालं ते रुचिताने स्वत: सांगितलं आहे.
Published on: Oct 31, 2025 03:19 PM
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

