मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी विमान कंपनीच्या मालकाच्या खात्यात 9 कोटी जमा, अंत्यविधीच्या दिवशी तर…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला तीन महिने पूर्ण झाले असतानाही तपासात ठोस पुरावे नसल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजेरी लावत तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली.

यावेळी रोहित पवार म्हणाले, ‘जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे आम्हाला कोणताही अधिकारी इथे दिसला नाही. कोणताही उपस्थित अधिकारी असा नव्हता ज्याला सर्व संदर्भ माहिती असतील. मात्र एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे विमान कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याच्या खात्यात अपघाताच्या दिवशी ९ कोटी ८१ लाख रुपये देण्यात आले होते. इतकेच नाही, तर अंत्यविधीच्या दिवशी जवळपास त्याच्या खात्यात १६ लाख रुपये हस्तांतरित केले गेले आहेत.”
पुढे रोहित पवार म्हणाले, “सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघातापासून आतापर्यंत व्ही. एस. आर. कंपनीला तब्बल १४५ कोटी रुपये मिळाले आहेत.” त्यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे.
Published on: Apr 28, 2026 02:58 PM
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर