राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी रोहित पवार यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “शरद पवार यांचा अनुभव…”
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हजर आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.
मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हजर आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले की, “शरद पवार यांचा राजकीय आणि सामाजिक अनुभव हा 60 वर्षाचा आहे. अशा पद्धतीने एवढा मोठा अनुभव असताना शरद पवारांच्या मनात काय, हे लोकांना राजकीय दृष्टीकोणातून कळत नाही. त्यामुळे शरद पवार काहीही करू शकतात, अशी भूमिका सर्वांची झाली आहे. या भूमिकेच्या आड काहीजण लपतात असं वाटतं. पण, याबद्दल शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे आणि करतील. गेलेले आमदार माझ्यामुळे नाही तर, शरद पवार आणि पक्षामुळे निवडून आले आहेत. त्यामुळे कोणामुळे निवडून आलो, हे मनात ठेवावं. दादा गटातील आमदारांना बोलण्याचा हक्क नाही.मी कोणत्याही आमदारांना फोन केला नाही. आपलं काही सहकार्य असेल, तर बोलू शकतो. पण, हक्काने शरद पवार आणि अजित पवार बोलू शकतात.”
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

