AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारसाहेब तुम्ही मैदानात उतरा, करोडो हात तुम्हाला साथ देतील; रोहित पवार यांची शरद पवारांना भावनिक साद

Rohit Pawar on Sharad Pawar : आज या दारात… उद्या त्या दारात, पण...; रोहित पवार यांचा कवितेच्या माध्यमातून अजित पवार गटावर निशाणा

पवारसाहेब तुम्ही मैदानात उतरा, करोडो हात तुम्हाला साथ देतील; रोहित पवार यांची शरद पवारांना भावनिक साद
| Updated on: Jul 05, 2023 | 1:03 PM
Share

मुंबई : अजित पवार यांनी बंड केलं. राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अशात शरद पवार यांनी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. तर अजित पवारांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. वाय बी चव्हाण सेंटरमधील शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला रोहित पवार हजर आहेत.

राष्ट्रवादीतील सध्याची परिस्थिती पाहता रोहित पवार भावनिक झाले आहेत. ट्विटरवरून एक कविता शेअर करत रोहित पवारांनी शरद पवार यांना भावनिक साद घातली आहे. पवारसाहेब तुम्ही मैदानात उतरा, करोडो हात तुम्हाला साथ देतील, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

याच कवितेच्या माध्यमातून रोहित पवारांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. आज या दारात… उद्या त्या दारात… पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल. मग लोकांना काय सांगणार? तोंड कसं दाखवणार?, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

रोहित पवार यांनी ट्विटरवर शेअर केलेली कविता जशीच्या तशी…

आज या दारात… उद्या त्या दारात… पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल मग लोकांना काय सांगणार? तोंड कसं दाखवणार? काल तर कडवा विरोध होता.. मग आज अचानक गळ्यात गळा कसा? तो कोणता गळ आहे… ज्या गळाला लागला मासा! तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं? रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं? अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार? किती दिवस आम्ही हेच ऐकायचं? जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा.. आता कुणाकडून करायची जनतेने आशा? भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा.. कोणता पक्ष… कोणता विचार.. अन् कसली निष्ठा.. इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा.. कालची भाषा एक होती… आज भलतंच बरळत आहेत… स्वार्थासाठी अनेकजण दात खाऊन पळत आहेत. कुठेय आपला तो सुसंस्कृत महाराष्ट्र… अन् कुठेय परंपरा? निर्लज्जपणाचा झाला कळस… तुम्हाला येत नाही याची किळस? मत ज्यांची घ्यायची… त्यांचीच चेष्टा करायची ही कोणती रित? ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली.. ती देशाला विचार देणारी पिढी आज कुठे हरवली? शिव-शाहू-फुले-आंबेडकर… तुम्ही महाराष्ट्र घडवला… तुमच्या पुरोगामी विचारांच रोपटं इथं रुजवलं.. पण आज याच रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन? हे होत असेल तर रोखायचं कुणी? विष पसरवणाऱ्याला थोपवायचं कुणी? त्यासाठी साहेब…. लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती आता तुम्हीच उठा… अन मैदानात उतरा… शेकडो… हजारो… लाखो… करोडो हात देतील तुम्हाला साथ.. त्यात माझेही असतील दोन हात..

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.