पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
विवेक भिमनवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर हा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र, हा राजीनामा राज्यपालांऐवजी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, विवेक भिमनवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. पेपरफुटी प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारत, विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. भिमनवार यांच्या कार्यकाळातच पेपर फुटल्याने त्यांचे नाव खराब झाल्याचा आणि त्यांना जबाबदार धरले जात असल्याचा पवारांचा आरोप आहे. पवारांनी सांगितले की, राजीनामा राज्यपालांकडे न देता मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याने या घटनेमागे राजकीय खेळी असल्याचा संशय आहे.
मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारल्यास भविष्यात अन्य पदाधिकाऱ्यांच्याही राजीनाम्याची मागणी होऊ शकते, अशी भीती त्यांना वाटत असावी. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य, जनतेच्या अपेक्षा आणि मुख्यमंत्र्यांचा वैयक्तिक अहंकार व मित्राला वाचवण्याची इच्छा यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचे रोहित पवारांनी नमूद केले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात की आपला मित्र आणि अहंकार जपवावा, हे ठरवावे, असे आवाहन पवारांनी केले आहे. या राजीनाम्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Oct 06, 2026 10:11 AM
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;

