अजित पवारांच्या अपघातातील विमानाचा CDR अमेरिकेच्या… रोहित पवारांचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला तीन महिने पूर्ण झाले असतानाही तपासात ठोस पुरावे नसल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजेरी लावली
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला तीन महिने पूर्ण झाले असतानाही तपासात ठोस पुरावे नसल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजेरी लावत तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली.
यावेळी रोहित पवार म्हणाले, ‘जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे आम्हाला कोणताही अधिकारी इथे दिसला नाही. कोणताही उपस्थित अधिकारी असा नव्हता ज्याला सर्व संदर्भ माहिती असतील. मात्र एक चांगली बाब म्हणजे, मीडियाच्या दबावामुळे आधी स्पष्ट करायला येत नसलेलं विमानाच्या घडामोडींचं CDR अमेरिकेच्या कंपनीने तपासलं आहे आणि संपूर्ण डेटा डाऊनलोड होत आहे.’
Published on: Apr 28, 2026 02:14 PM
Follow Us
Latest Videos
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन

