‘संजय राऊत यांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक…’, थेट पवार कुटुंबातूनच फटकारे
संजय राऊत यांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक असल्याचे म्हणत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी एक ट्वीट केले आहे. बघा काय म्हटलंय त्यात?
संजय राऊत यांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक असल्याचे म्हणत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी एक ट्वीट केले आहे. रोहित पवार यांनी केलेल्या ट्वीटमध्ये, दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे, असं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून रोहित पवार यांनी ट्वीट करत राऊतांवर भाष्य केलंय. ‘महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून बाळासाहेब ठाकरे, शऱद पवार यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली, सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला. पण मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊतांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. ‘एकनाथ शिंदेंना अशा प्रकराचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारं आहे’, असं म्हणत राऊतांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
